अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेण्यात यशस्वी झालेल्या भारतीय संघासमोर सलामीवीर पृथ्वी शॉची खराब कामगिरी हा चिंतेचा विषय बनला आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला पृथ्वी शॉ दुसऱ्या डावातही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. त्यातच पहिल्या डावात पृथ्वीने गलथान क्षेत्ररक्षण करत संघाच्या अडचणींमध्ये काहीशी भर घातली होती.
अवश्य वाचा – आश्विनला गृहीत धरणं ही ऑस्ट्रेलियन फलंदाजांची मोठी चूक – रिकी पाँटींग
दोन्ही डावांमध्ये केलेल्या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावरही भारतीय चाहते पृथ्वीवर टीका करत आहेत. भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खाननेही आगामी कसोटीत पृथ्वी संधी मिळणं कठीण असल्याचं म्हटलंय. “ज्यावेळी तुम्ही धावा करत असता त्यावेळी सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात. पण ज्यावेळी तुम्ही लवकर बाद होता, धावा होत नाहीत त्यावेळी सगळं कठीण होऊन बसतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज तुमची दुखरी नस शोधत असतात आणि ज्यावेळी त्यांना ती सापडते ते तुमच्यावर आक्रमण करतात. सध्या पृथ्वी शॉसोबत हेच घडतंय. भारतात खेळत असताना कदाचीत परिस्थिती तुमच्या बाजूने असते पण परदेशात खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेताना वेळ जातो. ज्या पद्धतीने तो पहिल्या कसोटीत बाद झालाय आणि त्याने ज्याप्रकारे सोपा कॅच सोडला ते पाहता दुसऱ्या कसोटीत त्याला स्थान मिळेल असं मला वाटत नाही.” झहीर Sony Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.
अवश्य वाचा – Ind vs Aus : पहिल्याच कसोटीत पृथ्वी शॉ शून्यावर बाद, नेटकरी संतापले
दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर संपवून ५३ धावांची आघाडी घेतली. रविचंद्रन आश्विनने ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात कर्णधार टीम पेनने नाबाद अर्धशतक झळकावत संघावरची नामुष्की टाळली. लाबुशेनने ४७ धावांची खेळी करत पेनला चांगली साथ दिली.
अवश्य वाचा – Ind vs Aus : पृथ्वी शॉ मुळे भारतीय संघावर १३ वर्षांनी ओढावली नामुष्की
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2020 10:00 am