News Flash

रामकुमारचे एकेरीतील आव्हान संपुष्टात

इजिप्तच्या महम्मद सावत याच्याविरुद्ध खेळताना रामकुमार दोन गेममध्ये ६-७, ४-६ असा पराभूत झाला.

(संग्रहित छायाचित्र)

शेनझेन  टेनिस स्पर्धा

चीनमध्ये सुरू असलेल्या शेनझेन टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन याला एकेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र दुहेरीत साकेत मायनेनीच्या साथीने त्याने आगेकूच कायम ठेवली आहे.

इजिप्तच्या महम्मद सावत याच्याविरुद्ध खेळताना रामकुमार दोन गेममध्ये ६-७, ४-६ असा पराभूत झाला. या पराभवामुळे आता या स्पर्धेतील एकेरीत भारताच्या आशा केवळ शशीकुमार मुकुंदवर टिकून राहिल्या आहेत.

दरम्यान, दुहेरीत खेळताना रामकुमार आणि साकेत या जोडीने तृतीय मानांकित माओ झिन गॉँग आणि झे झॉग या जोडीचा ६-३, ३-६, १०-८ असा पराभव केला. तसेच जीवन नेदुचेझियान आणि एन. श्रीराम बालाजी या जोडीनेदेखील सफवात आणि अ‍ॅलेकसँड्र नेदोव्यसोव जोडीवर ७-५, २-६, १०-७ असा विजय मिळवत आगेकूच केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 4:20 am

Web Title: ending ramkumars lone challenge
Next Stories
1 महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अ‍ॅँडरसनचा सहभाग निश्चित
2 भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य!
3 सचिन-विनोद पुन्हा मैदानात, आशीर्वादासाठी आचरेकर सरांकडे
Just Now!
X