भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कायम चर्चेत असतो. पण सोशल मीडियावर तो फार मोजक्याच गोष्टी ‘शेअर’ करतो. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून धोनी आपल्या कुटुंबाला आणि विशेषतः आपल्या मुलीला वेळ देताना दिसतो. पण धोनीने नुकताच इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये धोनी स्वतःच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे आणि अत्यंत निवांत क्षण ‘एन्जॉय’ करत आहे.

धोनीने रांचीजवळील एका धबधब्याखाली भिजतानाचा आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘रांची या शहराजवळ ३ धबधबे आहेत. त्यामुळे आपल्याला हवे तेव्हा या धबधब्यचा आनंद घेता येऊ शकतो. पण जेव्हा हा आनंद तुम्हाला १० वर्षांनी मिळतो, तेव्हा तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो’, असे कॅप्शनदेखील धोनीने या व्हिडीओला दिले आहे.

Video :

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करून केवळ १ दिवस झाला असून या व्हिडिओला २२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि या व्हिडीओ प्रचंड हिट झाला आहे.