लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना रंगत आहे. या सामन्यात भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत. लंचनंतर इंग्लंडने आपल्या सहा फलंदाजांना गमावले असून कर्णधार जो रूट अजून मैदानात तळ ठोकून आहे. भारताचा वेगवान गोलंदा जसप्रीत बुमराहने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ओली पोपला क्लीन बोल्ड करत कसोटीतील १००वा बळी पूर्ण केला. त्यानंतर बुमराहने १४३ किमी प्रतितास वेगाने यॉर्कर टाकत जॉनी बेअरस्टोची दांडी गुल केली.

आपल्या दुसऱ्या डावात शतकी सलामीसह सुरुवात करणाऱ्या इंग्लंडची अवस्था ६ बाद १४९ धावा अशी झाली. शार्दुल ठाकूरने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने बर्न्सला माघारी धाडले. त्यानंतर डेव्हिड मलान धावबाद झाला. दुसरा सलामीवीर हसीब हमीद ६० धावांवर रवींद्र जडेजाचा बळी ठरला. मोईन अलीलाही जडेजाने शून्यावर बाद केले.

हेही वाचा – IPL मध्ये ‘रांची’चा संघ उतरणार मैदानात? ‘या’ सहा शहरांची नावेही शर्यतीत

त्यानंतर बुमराहने आपल्या वेगवान गोलंदाजीने ओली पोप आणि जॉनी बेअरस्टोला तंबूचा मार्ग दाखवला. पहिल्या डावात अर्धशतक ठोकणाऱ्या पोपला या डावात २ धावा करता आल्या. तर बेअरस्टोला भोपळाही फो़डता आला नाही. बुमराहने टाकलेला यॉर्कर चेंडू बेअरस्टोला कळलाच नाही. बुमराह सर्वात जलद १०० कसोटी बळी घेणारा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने २४व्या कसोटीत १०० बळी घेतले.

 

 

भारतीय वेगवान गोलंदाज म्हणून सर्वात वेगवान १०० कसोटी विकेट्स: –