News Flash

ENG vs PAK : पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर

संघात माजी कर्णधार सर्फराज अहमदलाही संधी

करोनानंतर झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत इंग्लंडने वेस्ट इंडिजवर २-१ असा विजय मिळवला. त्या कसोटी मालिकेनंतर आयर्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेतही इंग्लंडचा संघ विजयी झाला. आता ५ ऑगस्टपासून इंग्लंड पाकिस्तानशी कसोटी मालिकेत दोन हात करणार आहे. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने आज १६ खेळाडूंचा संघ जाहीर केला.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानचा १६ खेळाडूंचा संघ- अझर अली, बाबर आजम, आबिद अली, असद शफीक, फवाद आलम, इमाम-उल-हक, काशिफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, यासिर शाह

पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर ३ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ५ ते २५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी अझर अलीकडे पाकिस्तानच्या संघाचं कर्णधारपद देण्यात आलेलं आहे. तर त्यानंतरच्या टी-२० मालिकेसाठी नवखा बाबर आझम संघाचे नेतृत्व करणार आहे.

पाकिस्तानचा संघ इंग्लंडला रवाना होण्याआधी संघ व्यवस्थापन आणि क्रिकेट बोर्डावर खूप टीका झाली होती. पाक क्रिकेट बोर्डाने केलेल्या कोविड चाचण्यांमध्ये आधी पाकिस्तानचे १० खेळाडू पॉझिटिव्ह आढळले होते. पण नंतर मात्र त्यापैकी सहा खेळाडूंचा अहवाल लगेचच निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बोर्डाच्या ढिसाळ कारभारावरून ते ट्रोल झाले होते. तसेच इंग्लंडला रवाना होणाऱ्या पाकिस्तानी संघाबद्दल ट्विटरवरून माहिती देताना पाकिस्तान हा शब्दच चुकवण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं हसं झालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 5:31 pm

Web Title: eng vs pak pakistan announce 16 man squad for first test versus england vjb 91
Next Stories
1 IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ‘इतक्या’ वेळा होणार करोना टेस्ट
2 युजवेंद्र चहल म्हणतो, कसोटी क्रिकेटसाठी लागणारा संयम माझ्याकडे आहे !
3 काश्मीर वादाच्या प्रश्नावर आफ्रिदीचं उत्तर, म्हणाला…
Just Now!
X