01 October 2020

News Flash

हातचा सामना गमावणाऱ्या पाकिस्तानचे आफ्रिदीने टोचले कान, म्हणाला…

इंग्लंडची सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी

शाहिद आफ्रिदी

पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटीत जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने ३ गडी राखून मात केली. दुसऱ्या डावात विजयासाठी २७७ धावांचं आव्हान मिळालेल्या इंग्लंडने ११७ धावांत ५ बळी गमावले होते. पण मधल्या फळीतील बटलर-वोक्स जोडीने दमदार भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने पहिल्या डावात आघाडी घेऊन आणि चौथ्या डावात चांगली सुरूवात करूनही हातचा सामना गमावला. त्यामुळे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानी खेळाडूंचे कान टोचले.

“संस्मरणीय विजयासाठी इंग्लंडचं अभिनंदन! बटलर आणि वोक्सने दमदार फलंदाजी केली. सामन्यावर पाकिस्तानची पकड होती, पण दुर्दैवाने त्यांनी हातचा सामना गमावला. गोलंदाजी खेळपट्टी पोषक होती, तरीदेखील गोलंदाजांना चौथ्या डावात चांगली कामगिरी करणं शक्य झालं नाही. अशा हातातल्या संधी गमावणं बरोबर नाही”, असं ट्विट आफ्रिदीने केलं.

पाकिस्तानचा पहिला डाव ३२६ धावांत तर इंग्लंडचा पहिला डाव २१९ धावांत आटोपला होता. पाकिस्तानचा दुसरा १६९ धावांत गुंडाळण्यात इंग्लंडला यश आले. त्यानंतर २७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था ५ बाद ११७ झाली होती. पण इंग्लंडने एकूण ७ गड्यांच्या मोबदल्यात आव्हान पूर्ण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 4:11 pm

Web Title: eng vs pak shahid afridi reaction on pakistans unfortunate loss in 1st test praise jos buttler chris woakes vjb 91
Next Stories
1 फाळणीपासून होणारी चूक पाकिस्तानने पुन्हा केली, पहिल्या कसोटी पराभवानंतर शोएब अख्तर भडकला
2 VIDEO : खतरनाक! आफ्रिदीने टाकलेला चेंडू फलंदाजालाही समजला नाही आणि…
3 BCCI वर कोणतंही आर्थिक संकट नाही – अध्यक्ष सौरव गांगुली
Just Now!
X