12 August 2020

News Flash

पहिला मान पाहुण्यांचा! वेस्ट इंडिजचा यजमान इंग्लंडवर विजय

करोनानंतरच्या पहिल्या सामन्यात ब्लॅकवूडची तडाखेबाज फलंदाजी

ENG vs WI 1st Test : करोनाच्या तडाख्यानंतर झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजला विजेतेपदाचा मान मिळाला. करोनामुळे सुमारे चार महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प होते. त्यानंतर ८ ते १२ जुलैदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार ९५ धावांची खेळी केली आणि संघाला ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी मिळवून दिली.

शेवटच्या दिवशी २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने झटपट तीन गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट, शाय होप आणि ब्रूक्स हे तिघे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले.पहिला गडी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला अजून एक धक्का बसला होता. जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला. त्याला खेळताना दुखापत झाली. त्यामुळे गरज पडली तरच तो फलंदाजीस उतरेल अशी माहिती विंडिज क्रिकेट बोर्डाने दिली. पण त्यानंतर रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी करत पाहुण्या संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. चेस ३७ धावांवर बाद झाल्यावर ब्लॅकवूडने होल्डरच्या साथीने डाव पुढे नेला. ब्लॅकवूड ९५ धावांवर बाद झाल्यावर होल्डरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती. त्यानंतर इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने (५०) अर्धशतकी खेळी केली. डेन्टलीनेही २९ धावा केल्या. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली. या दोघांनी ९८ धावांची भागीदारी केली. हे दोघे एकापाठोपाठ बाद झाले. क्राव्हलीने ७६ तर स्टोक्सने ४६ धावा केल्या. त्यानंतर जोफ्रा आर्चरने (२३) काही काळ झुंज दिली, पण इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला ३१३ धावाच करता आल्या. गॅब्रियलने ५, होल्डर-चेसने प्रत्येकी २ तर होल्डरने १ बळी टिपला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 10:29 pm

Web Title: eng vs wi 1st test west indies beat england as cricket returns after corona raise the bat series ben stokes jason holder jermaine blackwood shannon gabriel vjb 91
Next Stories
1 Video : आर्चरचा स्विंग अन् ब्रेथवेटची झाली दांडी गुल
2 ENG vs WI : करोनानंतरची पहिली कसोटी रंगतदार स्थितीत
3 “वर्ल्ड कप जिंकल्यावरच लग्न”; क्रिकेटपटूची प्रतिज्ञा
Just Now!
X