News Flash

ENG vs WI : वेस्ट इंडिजची दाणादाण; इंग्लंड भक्कम स्थितीत

ब्रॉडचे डावात ६ बळी, बर्न्सच्या दमदार ९० धावा

यानंतर तब्बल ३ वर्षांनी ब्रॉडने कसोटीत ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. सध्याच्या घडीला त्याच्या खात्यात ५०१ बळी जमा आहेत.

अखेरच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची दुसऱ्या डावात २ बाद १० अशी अवस्था झाली. त्याआधी इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करत २ बाद २२६ धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिजला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रेग ब्रेथवेट २ धावांवर आणि शाय होप ४ धावांवर नाबाद असताना दिवसाचा खेळ संपला.

इंग्लंडचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपल्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे १९७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेरीस मोठी आघाडी मिळाली. त्यातच दुसऱ्या डावात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी शतकी भागीदारी केल्यानंतर सिबली (५६) बाद झाला. त्यानंतर कर्णधार जो रूटच्या साथीने बर्न्सने डाव पुढे नेला. शतकाच्या नजीक असताना बर्न्स ९० धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रूटने (नाबाद ६८) डाव घोषित केला.

३९९ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजचे २ गडी १० धावांत तंबूत परतले. जॉन कॅम्पबेल आणि नाईट वॉचमन केमार रोच दोघेही झटपट बाद झाले. दोन्ही बळी स्टुअर्ट ब्रॉडनेच टिपले.

दरम्यान, ६ बाद १३७ या धावसंख्येवरून वेस्ट इंडिजने दिवसाच्या खेळाला सुरूवात केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळात वेस्ट इंडिजचा संघ केवळ ६१ धावांची भर घालू शकला. होल्डर ४६ तर डावरिच ३७ धावांवर माघारी परतला. कॉर्नवॉल आणि रोच झटपट बाद झाले आणि डाव १९७ धावांत संपुष्टात आला. स्टुअर्ट ब्रॉडने ६ बळी घेतले. अँडरसनने २, तर आर्चर-वोक्सने १-१ बळी टिपला.

ब्रॉडची दमदार कामगिरी

दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली. अवघ्या ३१ धावांत त्याने ६ बळी टिपले. ब्रॉडने १८व्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची किमया केली. तर १२व्यांदा एका डावात सहा बळी टिपण्याचा पराक्रम केला. एका डावात ६ बळी टिपणाऱ्या ब्रॉडच्या गोलंदाजीची सरासरी ७.५९ तर स्ट्राइक रेट १७.१ आहे. १० किंवा त्यापेक्षा अधिक वेळा डावात ६ बळी टिपणाऱ्या १४ गोलंजादांमध्ये ब्रॉडची आकडेवारी सरस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 11:42 pm

Web Title: eng vs wi 3rd test day 3 updates england in commanding position as west indies gets bad start in second innings vjb 91
Next Stories
1 सौरव गांगुलीने २०२३ विश्वचषकापर्यंत BCCI अध्यक्षपदी रहावं – सुनील गावसकर
2 “संपूर्ण मोहल्ल्याचं वीज बिल पाठवलं का?”; हरभजन संतापला
3 ENG vs WI : ब्रॉडचा भेदक मारा; ३१ धावांत घेतले ६ बळी
Just Now!
X