06 August 2020

News Flash

स्टोक्सचा बळींचा चौकार! कपिल, गॅरी सोबर्स, कॅलीसच्या पंगतीत स्थान

पहिल्या डावात वेस्ट इंडिजची शतकी आघाडी

३४.६ हा गोलंदाजीतला स्टोक्सचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे, तर १६.३३ ही स्टोक्सची गोलंदाजीतली दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे.

करोनाच्या भीतीने सुमारे चार महिने बंद असलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेच्या रूपाने सुरू झालं. क्रिकेटच्या पुनरागमनानंतर पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने सहा बळी घेत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपल्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या आणि ११४ धावांची आघाडी घेतली. पण वेस्ट इंडिजचे चार बळी टिपत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने दमदार कामगिरी केली आणि दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवले.

स्टोक्सने क्रेग ब्रेथवेट, शेन डावरिच, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ या चौघांना तंबूचा रस्ता दाखवला. जोसेफचा बळी टिपत स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये १५० बळींचा टप्पा गाठला. त्याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा आणि १५० बळी अशा दोन्ही गोष्टी गाठणारा स्टोक्स जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला. याआधी गॅरी सोबर्स, इयन बोथम, कपिल देव, जॅक कॅलीस, डॅनियल वेटोरी यांच्या पंगतीत स्थान मिळवले. अशी कामगिरी करणारा स्टोक्स दुसरा सर्वात जलद खेळाडू ठरला. सोबर्स यांनी ६३ कसोटींमध्ये ही कामगिरी केली होती, तर स्टोक्सने ६४ कसोटींमध्ये हा पराक्रम केला.

सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली, पण स्टोक्सने जोस बटलर आणि डॉम बेस यांच्या साथीने संघाला द्विशतकी मजल मारून दिली. स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या, तर बटलरने ३५ आणि बेसने नाबाद ३१ धावा केल्या. गॅब्रियल आणि होल्डर यांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा फार काळ निभाव लागला नाही. इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. होल्डरने सहा तर गॅब्रियलने ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. क्रेग ब्रेथवेट (६५) आणि शेन डावरिच (६१) यांनी दमदार अर्धशतके ठोकली. रॉस्टन चेसनेही चांगली खेळी करत ४७ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने त्रिशतकी मजल मारली. स्टोक्सने ४, अँडरसनने ३, बेसने २ तर मार्क वूडने १ गडी बाद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 11:10 am

Web Title: eng vs wi england captain ben stokes becomes sixth cricketer to complete 4000 runs and 150 wickets both in tests raise the bat vjb 91
Next Stories
1 यशासाठी कठोर परिश्रम हाच पर्याय – रहाणे
2 रद्द होऊनही विम्बल्डनकडून बक्षिसाची रक्कम
3 हॉकी अध्यक्षांचा राजीनामा
Just Now!
X