News Flash

ENG vs WI : इंग्लंडची गाडी दुसऱ्या डावात रूळावर

वेस्ट इंडिजला जशास तसं प्रत्युत्तर

जो रुटच्या नेतृत्वाखावी इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजवर मात करत अखेरचा कसोटी सामना जिंकला आणि मालिकेत २-१ ने बाजी मारली.

ENG vs WI Test Day 3: वेस्ट इंडिजने पहिल्या डावात शतकी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी दुसऱ्या डावात उपहारापर्यंत दमदार खेळ केला. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या सिबलीने दुसऱ्या डावात खेळपट्टीवर तळ ठोकला. सलामीवीर रॉरी बर्न्सदेखील चांगला खेळ करत होता, पण अर्धशतकाच्या नजीक येताना ४२ धावांवर तो रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर सिबलीने डेन्टलीच्या साथीने धावा करणं सुरू ठेवलं. उपहारापर्यंत इंग्लंडने १ बाद ७९ धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडचा पहिला डाव फलंदाजांसाठी फारसा चांगला ठरला नव्हता. सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली. सिबली, डेन्टली, क्रॉली, बर्न्स आणि ओली पोप हे पाच जण झटपट बाद झाले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ५ बाद ८७ होती. पण त्यानंतर स्टोक्सने जोस बटलर आणि डॉम बेस यांच्या साथीने संघाला द्विशतकी मजल मारून दिली. स्टोक्स-बटलर जोडीने ६७ धावांची भागीदारी केली. स्टोक्स सर्वाधिक ४३ धावा करून बाद झाला. पाठोपाठ बटलरही ३५ धावांवर तंबूत परतला. डॉम बेसने मात्र शेवटपर्यंत झुंज देत नाबाद ३१ धावा केल्या. पण गॅब्रियल आणि होल्डर यांच्या माऱ्यापुढे इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांचा फार काळ निभाव लागला नाही. इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. होल्डरने ६ तर गॅब्रियलने ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. क्रेग ब्रेथवेट (६५) आणि शेन डावरिच (६१) यांनी दमदार अर्धशतके ठोकली. रॉस्टन चेसनेही चांगली खेळी करत ४७ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने त्रिशतकी मजल मारली. स्टोक्सने ४, अँडरसनने ३, बेसने २ तर मार्क वूडने १ गडी बाद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 6:18 pm

Web Title: eng vs wi test match day 3 updates ben stokes jason holder shannon gabriel jos buttler stuart broad jofra archer raise the bat series vjb 91
Next Stories
1 Video : सुपर-स्विंग! काही समजण्याआधीच गॅब्रियलने उडवला फलंदाजाचा त्रिफळा
2 WC 2019 Flashback : आजच्या दिवशीच इंग्लंडने मिळवलं होतं फायनलचं तिकीट
3 विराटची मस्करी पडली महागात, ‘तो’ स्वत:च झाला ट्रोल
Just Now!
X