करोना विषाणूचा सामना करण्यासाठी मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. BCCI ही IPL 2020 पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केलं आहे. मात्र स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणार आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी ICC ने प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना आता हळूहळू यश येताना दिसत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध असलेल्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर वेस्ट इंडिजने मालिकेला होकार दिला. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्यावेळी १४ जणांचा जाहीर करून १० खेळाडू राखीव ठेवले आणि संघ ८ जूनला इंग्लंडमध्ये दाखल झाला. त्यानंतर गुरूवारी या संघात वेगवान गोलंदाज शॅनॉन गॅब्रियलला अधिकृतरित्या १५ वा खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले. ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार असून हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत.

१४ खेळाडूंचा संघ

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी आपला १४ जणांचा संघ जाहीर केला होता. डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल या ३ खेळाडूंनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं कारण देत न खेळण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या खडतर काळात बोर्ड कोणत्याही खेळाडूला जबरदस्ती करणार नाही असं विंडीज बोर्डाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर वेस्ट इंडिजने १४ खेळाडू आणि १० राखीव खेळाडू असा संघ आपल्या ट्विटरवरून जाहीर केला होता. त्यातील राखीव खेळाडूंमध्ये गॅब्रियलचा समावेश होता, पण गुरूवारी मात्र त्याला अधिकृतरित्या संघाच्या चमूत स्थान मिळाले.

वेस्ट इंडिजचा संघ – जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शॅनॉन गॅब्रियल

कसोटी मालिकेचं वेळापत्रक –

८ ते १२ जुलै – पहिली कसोटी (Ageas Bowl)
१६ ते २० जुलै – दुसरी कसोटी (Old Trafford)
२४ ते २८ जुलै – तिसरी कसोटी (Old Trafford)