News Flash

Video : भन्नाट सेलिब्रेशन! आधी षटकार मग त्याच गोलंदाजाला मारला सलाम

गडी बाद केल्यावर सलाम ठोकत फलंदाजाला खिजवणे ही या गोलंदाजांची ट्रेडमार्क स्टाईल आहे. त्याला फलंदाजाने त्याच्याच भाषेत उत्तर दिले.

इंग्लंडने विंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात २९ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे त्यांनी ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ४१८ धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला मात्र ३८९ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून  जोस बटलर याने १५० धावांची खेळी तुफानी खेळी केली. त्यालाच सामनावीर जाहीर करण्यात आले.

सामन्यात शेल्डन कॉट्रेल या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर जोस बटलरने केलेली कृती हा चर्चेचा विषय ठरला. बटलरने आपल्या १५० धावांच्या खेळीत ७७ चेंडूत १३ चौकार आणि १२ षटकार लगावले. बटलरने विंडीजच्या सगळ्या गोलंदाजांची पिसे काढली. या पैकी कॉट्रेल गोलंदाजी करत असताना बटलरने त्याला उत्तुंग असा षटकार लगावला. पण त्यानंतर त्याने केलेला सलाम चर्चेचा विषय ठरला. गडी बाद केल्यावर सलाम ठोकत फलंदाजाला खिजवणे ही या गोलंदाजांची ट्रेडमार्क स्टाईल आहे. त्यामुळे बटलरने त्याला षटकार मारल्यावर त्याच्याच भाषेत त्याला उत्तर दिले.

दरम्यान, ४१९ धावांचा पाठलाग करताना गेलनेही तुफान खेळी केली. त्याने ९७ चेंडूत १६२ धावा तडकावल्या. या खेळीत त्याने तब्बल १४ षटकार लगावले आणि ११ चौकाराची जोड दिली. विंडीजकडून डॅरेन ब्राव्हो (६१) आणि कार्लोस ब्रेथवेट (५०) यांनी गेलला चांगली साथ केली. पण तरीदेखील त्यांचे प्रयत्न २९ धावांनी तोकडे पडले. इंग्लंडकडून बटलरला कर्णधार मॉर्गन (१०३) आणि हेल्स (८२) याने उत्तम साथ केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 11:26 am

Web Title: eng vs wi video jos buttler hits six and salutes sheldon cottrell in his style itself
Next Stories
1 वादविवादामुळे अधिक परिपक्व झालो – लोकेश राहुल
2 वरळीच्या किल्ल्याचा शरीरसंवर्धनाचा बुरूज!
3 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा बडोद्यावर विजय
Just Now!
X