News Flash

इंग्लंडचा अष्टपैलू डेव्हिड विलीला करोनाची लागण

सोशल मीडियावरुन दिली माहिती

इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीला करोनाची लागण झाली आहे. डेव्हिडने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात आयर्लंडविरुद्ध विली आपला अखेरचा वन-डे सामना खेळला होता. विलीसोबत त्याच्या बायकोचा अहवालही पॉझिटीव्ह आला आहे.

टी-२० ब्लास्ट स्पर्धेत यॉर्कशायर संघाकडून डेव्हिड विली खेळत होता. विलीसोबतच यॉर्कशायर संघाच्या ३ खेळाडूंनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या सर्व खेळाडूंना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होऊन उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच या खेळाडूंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी होणार आहे. डेव्हिड विलीने आतापर्यंत ४९ वन-डे आणि २८ टी-२० सामन्यांत इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलमध्ये विलीने चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 1:10 pm

Web Title: england all rounder david willey tests positive for covid 19 psd 91
Next Stories
1 विराट-रोहित अव्वल स्थानी कायम
2 धोनीचा चिनी कंपनीशी करार
3 बार्सिलोनाच्या विजयात मेसी चमकला
Just Now!
X