वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आज १३ सदस्यीस संघाची घोषणा केली आहे. तब्बल ३ महिन्यांच्या लॉकडाउननंतर ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु होत आहे. विंडीज आणि इंग्लंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने या सामन्यातून विश्रांती घेतली असून बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी असा असेल इंग्लंडचा संघ –

बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), झॅक क्रॉली, जोए डेनली, ऑली पोप, डॉम सिबले, ख्रिस वोक्स, मार्क वूड

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यासाठी ९ खेळाडूंना राखीव ठेवलं आहे. सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूची तब्येत बिघडली किंवा त्याच्यात करोनाची लक्षणं आढळली तर सामनाधिकाऱ्यांच्या संमतीने बदली खेळाडू घेण्याची परवानगी संघांना देण्यात आलेली आहे.