01 March 2021

News Flash

भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा

नवोदित जेमी पोर्टरला संघात स्थान

आदिल रशिदलाही संघात स्थान

भारताविरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आज इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. वन-डे मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या आदिल रशिदला संघात जागा देण्यात आली आहे. या निवडीवर इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. याव्यतिरीक्त ख्रिस वोक्सला वगळून २५ वर्षीय जेमी पोर्टरला पहिल्यांदा इंग्लंडच्या संघात जागा मिळालेली आहे.

भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी असा असेल इंग्लंडचा संघ –

जो रुट (कर्णधार), अॅलिस्टर कुक, केटॉन जेनिंग्ज, डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, आदिल रशिद, सॅम कुरन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, जेमी पोर्टर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 5:50 pm

Web Title: england announce test squad for india test
टॅग : Bcci
Next Stories
1 ‘जरा डोकं तरी वापरा’!, आशिया चषक वेळापत्रकावरुन BCCI ची आशियाई क्रिकेट परिषदेवर टीका
2 आशिया चषकातून माघार घ्या, संतप्त विरेंद्र सेहवागचा भारतीय संघाला सल्ला
3 ज्युनिअर द्रविड मैदानात चमकला, संघाच्या विजयात मोलाचा हातभार
Just Now!
X