करोनाच्या साथीमुळे यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडली असली, तरी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील लढतीचा आनंद त्यांना लुटता येणार आहे.

जागतिक ट्वेन्टी-२० क्र मवारीत पहिल्या दोन स्थानांवर असलेल्या या दोन संघांमधील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिके तील पहिला सामना रोझ बाऊल येथे शुक्र वारी रंगणार आहे. ‘‘इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मैदानांवरील वैर सर्वश्रुत आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार तुम्हाला अनुभवता येईल,’’ असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिन्चने सांगितले. नुकतीच झालेली इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.

*  सामन्याची वेळ : रात्री १०.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३