04 March 2021

News Flash

….त्याने सामना जिंकला आणि प्रेमही! इंग्लंडच्या बास्केटबॉलपटूचं प्रेयसीला भर मैदानात प्रपोज

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बास्केटबॉल सामन्यादरम्यान घातली लग्नाची मागणी

जेमिलने गुडघ्यावर बसत जॉर्जियाला लग्नाची मागणी घातली

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सर्व देशांचे खेळाडू पदकं मिळवण्यासाठी जिवाची बाजी लावत आहेत. मात्र इंग्लंडच्या बास्केटबॉल संघातील जेमील अँडरसन या खेळाडूने, मैदानातचं महिला संघातील आपल्या एका सहाकारी खेळाडूला लग्नाची मागणी घातली आहे. जॉर्जिया जोन्स असं या महिला बास्केटबॉलपटूचं नाव असून…या अनोख्या लग्नाच्या मागणीची क्षणचित्र इंग्लंड बास्केटबॉल संघाच्या ट्विटर हँडलवर प्रसारित करण्यात आली आहेत.

बास्केटबॉलच्या दुसऱ्या फेरीत इंग्लंडच्या संघाने कॅमरुनवर ८१-५४ अशी मात केली. यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जेमील अँडरसनने जॉर्जियाला प्रपोज करण्यासाठी खास प्लान आखला. आपल्यास संघातील सहकारी खेळाडूने आपल्याला लग्नाची मागणी घातल्यानंतर जॉर्जियाच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे होते. महत्वाची गोष्ट म्हणजे जॉर्जियाचे वडील व इंग्लंडच्या संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जेफ जोन्स यांनीही मान्यता दिलेली आहे.

आपल्याला या घटनेची जराशीही कल्पना नव्हती. जेमील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मला सरप्राईज देण्याचा चांगला प्लान आखला होता, असं म्हणत जॉर्जियाने जेमिलचं कौतुक केलं. जेमीलनेही आपल्या दोघांच्या आयुष्यात बास्केटबॉलला विशेष महत्व असल्याचं सांगितलं. सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये या दोन खेळाडूंच्या प्रेमकहाणीची चर्चा जास्त रंगताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 3:30 pm

Web Title: england basketball players get engaged on court at the commonwealth games
टॅग : Hockey India
Next Stories
1 आफ्रिदीनंतर शोएब अख्तरनेही आळवला काश्मीर राग, म्हणाला…
2 भारतीय बॅडमिंटन संघाचा धडाका कायम, सिंगापूरवर ३-१ ने मात करुन अंतिम फेरीत प्रवेश
3 इंग्लंडवर मात करुन भारतीय महिला अंतिम फेरीत, टेबल टेनिसमध्ये भारताचं एक पदक निश्चीत
Just Now!
X