तीन टी-२० सामन्याची एकदिवसीय मालिका इंग्लंडनं ३-० च्या फरकानं जिंकली आहे. टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ह सलग तिसरा पराभव होता. तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने आफ्रिकेचा ९ गड्यांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेनं इंग्लंडला १९२ धावांचं लक्ष दिलं होतं. हे आवाहन इंग्लंडनं एक गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. डेव्हिड मलान आणि बटलर यांच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडनं आफ्रिकेचा पराभव केला.

मलान आणि बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची विक्रमी भागिदारी केली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासत दुसऱ्या क्रमांकावरील ही सर्वात मोठी भागिदारी आहे. मलानने ४७ चेंडूत ९९ धावांची खेळी केली. यामध्ये पाच षटकार आणि ११ चौकार लगावले. बटलरने ४६ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत बटलरने ५ षटकार आणि ३ चौकार लगावले. ९९ धावांच्या विजयी खेळीमुळे मलान याला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

डु-प्लेसिस आणि डुसेन यांच्या अर्धशथकी खेळीच्या बळावर आफ्रिकेनं तिसऱ्या टी-२० सामन्यात निर्धारित २० षटकांर ३ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. फाफ डु प्लेसिसने नाबाद ५२ आणि डुसेन यानं नाबाद ७४ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सला दोन तर जॉर्डनला एक विकेट मिळाली.