भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारेने आश्चर्यकारक कामगिरी केली. तिन्ही फलंदाजांनी जोमाने फलंदाजी केली. रोहितने १२७, तर केएल राहुलने ४७ धावा केल्या. त्यानंतर पुजाराने वेगातने ६१ धावा केल्या. या त्रिकुटाच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात २७० धावा केल्या.

पुजाराने इंग्लंडच्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने चांगलेच धुतले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हरटननेही पुजारावर दबाव आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. ओव्हरटनविरुद्ध पुजाराने बऱ्याच धावा जोडल्या. पुजाराची फलंदाजी पाहून ओव्हरटनला स्वतःवरच राग येऊ लागला आणि ४९ व्या षटकात त्याने तो राग व्यक्त केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुजाराने ओव्हरटनच्या चेंडूवर बॅकफूटवर दोन सुंदर चौकार मारले, ज्यामुळे तो चिडला. यानंतर, चौथ्या चेंडूवर काय घडले हे स्पष्ट झाले की इंग्लंड चिंताग्रस्त होत आहे. ओव्हरटनने सरळ चेंडू टाकला, त्यावर पुजाराने शानदार बचाव केला. त्यानंतर ओव्हरटनने चेंडू रोखला आणि त्यानंतर रागात त्याने भासवले की जणू तो चेंडूने फलंदाजाला मारणार आहे. अशाप्रकारे त्याने पुजाराला घाबरवण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे. ओव्हरटन पुजाराने मारलेल्या चौकारावर नाखूष होता. मात्र, पुजारा मोठा शॉट खेळण्याची कोणतीही संधी सोडत नव्हता.