29 October 2020

News Flash

अखेरच्या वन-डे आधी इंग्लंडच्या गोटात चिंतेचं वातावरण, जेसन रॉय दुखापतग्रस्त

इंग्लंडकडून सॅम बिलींग्जला संघात पाचारण

जेसन रॉय दुखापतग्रस्त

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्याआधी इंग्लंडच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सलामीवीर जेसन रॉय दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून इंग्लंडने सॅम बिलींग्जला संघात पाचारण केलं आहे. लॉर्ड्सवरील दुसऱ्या सामन्यात रॉयच्या बोटाला दुखापत झाली होती.

हेडिंग्लेच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या निर्णायक सामन्याआधी जेसन रॉय फिटनेस टेस्ट देणार आहे. यानंतर त्याच्या तिसऱ्या सामन्यातील सहभागाबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. याआधीही इंग्लंडने डेवीड मालान आणि सॅम कुरन यांना संघातून विश्रांती देत जेम्स विन्सला संघात जागा दिली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात जेसन रॉय खेळतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 10:00 pm

Web Title: england call up billings as cover for injury doubt roy
Next Stories
1 मयांक डागरचा यो-यो चाचणीत नवा विक्रम, कर्णधार विराट कोहलीलाही टाकलं मागे
2 बॉल टॅम्परिंग प्रकरण भोवलं, लंकन कर्णधार दिनेश चंडीमलवर ४ वन-डे – २ कसोटी सामन्यांची बंदी
3 स्मिथ-वॉर्नर जोडीला धक्का, बिगबॅश लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाकारली
Just Now!
X