विराट कोहलीच्या टीम इंडियाची येत्या वर्षात सर्वात मोठी सत्वपरीक्षा होणार आहे. २०१८ साली भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक निश्चीत करण्यात आलेलं आहे. या दौऱ्यात विराट कोहलीचा भारतीय संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे. भारताच्या इंग्लड दौऱ्याला २०१८ साली ३ जुलै रोजी सुरुवात होणार आहे.

भारताचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. यापैकी ३ कसोटी आणि ५ वन-डे सामन्यांची मालिका भारताने निर्विवाद आपल्या खिशात घातली आहे. याप्रमाणेच एकमेव टी-२० सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेचा सुपडा साफ करण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर सर्वात प्रथम ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंड आणि सर्वात शेवटी श्रीलंकेशी खेळणार आहे. यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्याच्या तारखा अजुनही निश्चीत झालेल्या नसल्या तरीही भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सोपा नसणार आहे.

असा आहे भारताच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम –

३ जुलै – पहिली टी-२०, ठिकाण – ओल्ड ट्रॅफर्ड

६ जुलै – दुसरी टी-२०, ठिकाण – कार्डिफ

८ जुलै – तिसरी टी-२०, ठिकाण – ब्रिस्टॉल

 

१२ जुलै – पहिली वन-डे, ठिकाण – ट्रेंट ब्रिज

१४ जुलै – दुसरी वन-डे, ठिकाण – लॉर्ड्स

१७ जुलै – तिसरी वन-डे, ठिकाण – हेडिंग्ले

 

१ ते ५ ऑगस्ट – पहिली कसोटी, ठिकाण – एजबस्टन

९ ते १३ ऑगस्ट – दुसरी कसोटी, ठिकाण – लॉर्ड्स

१८ ते २२ ऑगस्ट – तिसरी कसोटी, ठिकाण – ट्रेंट ब्रिज

३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर – चौथी कसोटी, ठिकाण – Ageas Bowl मैदान

७ ते ११ सप्टेंबर – पाचवी कसोटी, ठिकाण – ओव्हल