क्रिकेटच्या मैदानावर फक्त प्रतिस्पर्धी संघाचाच नव्हे तर ड्रेसिंग रुममध्ये आपल्या सहकाऱ्याचा कसा आदर ठेवायचा हे मागच्यावर्षी इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघान दाखवून दिले. मागच्यावर्षी इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजय मिळवला. त्यावेळी मोईन अलीला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल मालिकावीराचा पुरस्कार जाहीर झाला.

इंग्लंडच्या क्रिकेट परंपरेनुसार कुठल्याही मोठया विजयानंतर शॅम्पेनची बॉटल फोडून आनंद साजरा केला जातो. विजयानंतर इंग्लंडचा संघ सामूहिक फोटोसाठी तयार होता. त्यांच्या हातात शॅम्पेनच्या बाटल्या होत्या. सर्वजण हा विजय साजरा करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी अॅलिस्टर कुकचे एकाबाजूला उभ्या असलेल्या मोईन अलीकडे लक्ष गेले.

मुस्लिम धर्मामध्ये दारुला मान्यता नाहीय. त्यामुळे मोईन अली एकाबाजूला उभा होता. कुक आणि अन्य सहकाऱ्यांनी लगेच मोईन फोटोसाठी बोलावले. मोईनसाठी त्यांनी शॅम्पेन न उडवण्याचा निर्णय घेतला. संघाचा एकत्रित फोटो काढल्यानंतर मोईन लगेच बाजूला गेला त्यानंतर अन्य इंग्लिश क्रिकेटपटूंनी शॅम्पेन उडवून आपला आनंद साजरा केला. इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने संघाची संस्कृती कशी असावी याबाबत बोलताना हे इंग्लिश संघाचे हे उदहारण दिले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.