भुवनेश्वर : आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात न्यूझीलंडला २-० असे नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

इंग्लंडसाठी विल कॅलनन (२५ मिनिट) आणि आणि ल्युक टेलर (४४ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडची ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाशी बुधवारी गाठ पडणार आहे. अर्जेटिनाने ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, तर या गटात तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या न्यूझीलंडचे पराभवामुळे उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आव्हान संपुष्टात आले आहे.

आजचे सामने

’बेल्जियम वि. पाकिस्तान

वेळ : सायं. ४.४५ वा.

’नेदरलँड्स वि. कॅनडा

वेळ : सायं. ७ वा.

’थेट प्रक्षेपण:

स्टार स्पोर्टस १, सिलेक्ट १