News Flash

इंग्लंड बाद फेरीसाठी उत्सुक

युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘ड’ गटात इंग्लंडची गाठ मंगळवारी मध्यरात्री चेक प्रजासत्ताकशी पडणार आहे.

वृत्तसंस्था, लंडन

युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘ड’ गटात इंग्लंडची गाठ मंगळवारी मध्यरात्री चेक प्रजासत्ताकशी पडणार आहे. दोन्ही संघांनी चार गुणांसह अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान प्राप्त केले असून या सामन्यात बरोबरी पत्करून बाद फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी ते उत्सुक आहेत.

इंग्लंड संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इंग्लंडने स्कॉटलंडवर विजय मिळवत थाटात सुरुवात केली. पण पुढील सामन्यात त्यांना स्कॉटलंडविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करावी लागली. चेक प्रजासत्ताकने स्कॉटलंडवर २-० असा विजय साकारल्यानंतर क्रोएशियाविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करली होती.

क्रोएशिया, स्कॉटलंड पहिल्या विजयासाठी आतुर

ग्लास्गो : युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मंगळवारी मध्यरात्री स्कॉटलंड आणि क्रोएशिया हे दोन्ही संघ हॅम्पडेन पार्क स्टेडियमवर एकमेकांशी भिडतील. ‘ड’ गटात दोन्ही संघ प्रत्येकी एका गुणासह तळाच्या स्थानी असून ते पहिल्या विजयासाठी आतुर आहेत.

फ्रान्सचा आक्रमक डेम्बेलेची माघार

पॅरिस : गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे फ्रान्सचा आक्रमक उस्मान डेम्बेलेने युरो चषक फुटबॉल स्पध्रेतून माघार घेतली आहे, असे फ्रान्स फुटबॉल महासंघाने सोमवारी जाहीर केले. हंगेरविरुद्धच्या सामन्यात डेम्बेले याला दुखापत झाली. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. रविवारी बुडापेस्ट येथील रुग्णालयात डेम्बेलेची क्ष-किरण चाचणी घेण्यात आली. डेम्बेले याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी कालावधी लागेल, असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 1:48 am

Web Title: england look forward to the knockout stages euro 2020 ssh 93
Next Stories
1 ऑलिम्पिकसाठी जपानमधील १० हजार प्रेक्षकांना परवानगी
2 पेरूचे स्पर्धेतील आव्हान कायम
3 गोळाफेकपटू ताजिंदर ऑलिम्पिकसाठी पात्र
Just Now!
X