News Flash

जेव्हा अँडरसननं ब्रॉडला म्हटलं होतं ‘लेस्बियन’..! ११ वर्षांपूर्वीचं ट्वीट आणणार गोत्यात?

''माझ्यासाठी ही १०-११ वर्षांपूर्वीची घटना आहे. मी आता एक व्यक्ती म्हणून बदललो आहे''

स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन

वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनच्या वादग्रस्त ट्विटच्या प्रकरणामुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप निर्माण झाला आहे. एकेक करून इतर खेळाडूंची नावे समोर येत आहेत, ज्यांनी रॉबिन्सनपूर्वीही वादग्रस्त ट्विट केले होते. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) या खेळाडूंविरुद्ध कडक कारवाई करण्याची तयारी करत आहे. रॉबिनसनला निलंबित केल्यानंतर आता जेम्स अँडरसनसुद्धा या वादात अडकण्याची शक्यता आहे. त्याचे ११ वर्षांपूर्वीचे एक ट्वीट समोर आले आहे, ज्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडला ‘लेस्बियन’ म्हटले होते.

३८ वर्षीय अँडरसनचे हे ट्वीट फेब्रुवारी २०१०चे आहे. ”आज मी पहिल्यांदा ब्रॉडचे नवीन हेअरकट पाहिला. तो १५ वर्षाच्या लेस्बियनसारखा दिसत आहे”, असे अँडरसनने या ट्वीटमध्ये म्हटले होते. हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर अँडरसनने आपले स्पष्टीकरण दिले. ”माझ्यासाठी ही १०-११ वर्षांपूर्वीची घटना आहे. मी आता एक व्यक्ती म्हणून बदललो आहे”, असे अँडरसनने स्पष्टीकरणात सांगितले.

हेही वाचा – आरा रा रा खतरनाक..! टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूनं केलाय ‘गजनी’ लूक

england pacer james anderson offensive tweets against stuart broad goes viral जेम्स अँडरसनचे जुने ट्वीट

 

अँडरसनशिवाय ईऑन मॉर्गन, जोस बटलर, जो रूट आणि डोम बेस यांच्यासह इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंचे आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे या खेळाडूंच्या समस्याही वाढू शकतात.

हेही वाचा – ‘‘…तर डिव्हिलियर्ससारखे मोठे खेळाडू पाकिस्तान सुपर लीगकडे आकर्षिक होतील”

ईसीबीची भूमिका

”रॉबिनसनच्या प्रकरणानंतर आम्ही सतर्क झालो आहोत. म्हणूनच आम्ही यापूर्वीही इतर बर्‍याच खेळाडूंनी केलेल्या वादग्रस्त पोस्टवर लक्ष ठेवून आहोत. आमच्या खेळात भेदभावाला स्थान नाही. आम्ही आवश्यक पावले उचलण्यास वचनबद्ध आहोत. ही केवळ एका प्रकरणाशी संबंधित बाब नाही. प्रत्येक प्रकरण वेगळ्या प्रकारे पाहता येईल. सर्व वस्तुस्थितीचा आढावा घेत पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल”, असे ईसीबीने सांगितले आहे. त्यामुळे अँडरसनवर मोठी कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:27 pm

Web Title: england pacer james anderson offensive tweets against stuart broad goes viral adn 96
Next Stories
1 आरा रा रा खतरनाक..! टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूनं केलाय ‘गजनी’ लूक
2 ‘‘…तर डिव्हिलियर्ससारखे मोठे खेळाडू पाकिस्तान सुपर लीगकडे आकर्षित होतील”
3 ‘‘टीम इंडियाला माझी गरज, मी कौशल्य दाखवलं तर वर्ल्डकप जिंकता येईल”
Just Now!
X