News Flash

इंग्लंडचे खेळाडूही जर्सीवर लावणार Black Lives Matter चा लोगो

काय आहे Black Lives Matter... जाणून घ्या

करोनाच्या धसक्यामुळे तब्बल तीन-चार महिने क्रिकेट सामने बंद होते. पण आता हळूहळू आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्वपदावर येत आहे. ८ जुलै पासून इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज अशी ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाची पोलीस कोठडीत हत्या झाली. त्यामुळे कृष्णवर्णीय लोकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने Black Lives Matter अशी मोहिम सुरू करण्यात आली. कृष्णवर्णीयांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘कृष्णवर्णीय लोकांच्या जीवाचेही मोल असते’ (Black Lives Matter) अशी ही मोहिम आहे. पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजचे खेळाडू Black Lives Matter चा लोगो असलेली जर्सी घालून खेळणार आहेत. अमेरिकेतील या प्रकरणावर विंडीजच्या अनेक खेळाडूंनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवणं आमचं कर्तव्य असल्याचं विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने सांगितलं होतं.

वेस्ट इंडिजचे खेळाडू असा लोगो असलेली जर्सी घालून खेळणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानेही एक निर्णय घेतला आहे. संपूर्ण कसोटी मालिकेत इंग्लंडचे खेळाडूदेखील Black Lives Matter असा लोगो असलेली जर्सी परिधान करणार असल्याची माहिती इंडो एशियन न्यूज सर्व्हिसने दिली. “इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा Black Lives Matter या संकल्पनेला पूर्णपणे पाठिंबा आहे. सामाजिक जीवनातसकारात्मक बदल घडवण्यासाठी ही मोहिम सुरू झाली आहे. खेळात किंवा समाजात वर्णद्वेषाला थारा नाही हे यातून दिसते आणि त्यासाठी आम्ही यास पाठिंबा देत आहोत”, असे ECB चे मुख्य कार्य़कारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले.

फोटो सौजन्य – वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड ट्विटर

दरम्यान, ICC ने देखील हे लोगो असलेल्या जर्सी घालायला वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना परवानगी दिली. त्यानंतर ICC ला नेटकऱ्यांनी धोनीच्या खास ग्लोव्ह्जला विरोध केल्याची आठवण करून दिली. ICC ने राजकीय वाद आणि वर्णद्वेषाबाबत क्रीडांगणावर काही करण्यासाठी परवानगी देण्याची ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सोमवारी ICC ने विंडीजच्या खेळाडूंना ती जर्सी वापरण्यास परवानगी दिली. यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा २०१९ च्या वर्ल्ड कपमधील एक वाद पुन्हा एकदा समोर आला. धोनीने स्पर्धेत ‘बालिदान बॅच’ असलेले ग्लोव्ह्ज वापरले होते. त्यावेळी राजकीय किंवा धार्मिक गोष्टींना परवानगी दिली जाणार नाही, असे सांगून ICC ने ते ग्लोव्ह्ज न वापरण्याचे आदेश दिले होते. या मुद्द्यावरून भारतीय चाहत्यांनी ICC वर संताप व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 10:34 am

Web Title: england players to carry black lives matter logo on shirts in test series against west indies vjb 91
Next Stories
1 वेस्ट इंडिजच्या संघात शॅनॉन गॅब्रियलचा अधिकृतरित्या समावेश
2 IPLमध्ये ‘या’ संघातून खेळायला आवडेल – श्रीसंत
3 ज्येष्ठ कॅरम संघटक जनार्दन संगम यांचे निधन
Just Now!
X