इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना दोलायमान अवस्थेत आहे. इंग्लंडने आफ्रिकेपुढे विजयासाठी ४१६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेची ४ बाद १३६ अशी स्थिती आहे. त्यामुळे या सामन्याच्या पाचव्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी असून ही लढत चांगलीच रंगतदार होण्याची आशा आहे.

इंग्लंडने ३ बाद १७२ धावांवरून पुढे खेळताना दुसऱ्या डावात ३२६ धावा केल्या. जो रुट (७३) आणि जॉनी बेअरस्टोव्ह (७८) यांनी इंग्लंडच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. आफ्रिकेचा फिरकीपटू डेन पीडने या वेळी इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला. विजयासाठी ४१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात आश्वासक झाली नाही. वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने तीन फलंदाज बाद करत आफ्रिकेला धक्का दिला. चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेची ४ बाद १३६ अशी स्थिती असून त्यांची मदार मुख्यत्वेकरून एबी डी’व्हिलियर्सवर (खेळत आहे ३७) आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ३०३

द. आफ्रिका (पहिला डाव) : २१४

इंग्लंड (दुसरा डाव) : १०२.१ षटकांत सर्व बाद ३२६ ( जॉनी बेअरस्टोव्ह ७८, जो रुट ७३; डीन पीड ५/१५३, स्टीअ‍ॅन व्हॅन झील ३/२०)

द. आफ्रिका (दुसरा डाव) : ४७ षटकांत ४ बाद १३६ (एबी डी’व्हिलियर्स खेळत आहे ३७; स्टिव्हन फिन ३/२७)