ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने सफाईदार विजय मिळवल मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाने आश्वासक कामगिरी केली आहे. परंतू दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी एका अजब DRS चा निर्णय घेऊन आपलं हसं करुन घेतलं.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, यानंतर फिंचने डाव सावरला. सातव्या षटकात आदील रशिदच्या गोलंदाजीवर तिसरा चेंडू खेळत असताना फिंचने बचाव केला. यावेळी चेंडू हा फिंचच्या बॅटला लागल्याचं सरळ दिसत होतं. परंतू यष्टीरक्षक जोस बटलरने फिंच पायचीत असल्याचं अपील केलं. इतकच नव्हे तर त्याने कर्णधार मॉर्गनला DRS घेण्यासाठी भागही पाडलं. पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी १५८ धावांचं आव्हान दिलं होतं. जोस बटलरच्या नाबाद ७७ धावांच्या जोरावर इंग्लंडने हे आव्हान सहज पूर्ण केलं.