22 September 2020

News Flash

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी

भारताने ब-गटातून साखळीच्या टप्प्यात गटातील तीनही सामने जिंकले आहेत.

| November 20, 2018 01:58 am

मिताली राज

ग्रोस आयलेट : आयसीसी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत शुक्रवारी उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. अखेरच्या गटसाखळी सामन्यात वेस्ट इंडिजने २००९च्या विश्वविजेत्या इंग्लंडचा चार गडी राखून पराभव केला.

भारताने ब-गटातून साखळीच्या टप्प्यात गटातील तीनही सामने जिंकले आहेत. मागील वर्षी एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत इंग्लंडकडून पराभव पत्करल्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्या पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी भारत उत्सुक आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने साखळीतील अखेरच्या सामन्यात तीन वेळा विश्वविजेत्या आस्ट्रेलियाला नमवण्याची किमया साधली होती.

गतविजेत्या वेस्ट इंडिजने अ-गटातून ८ गुणांसह विजेत्याच्या रुबाबात उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांची २२ नोव्हेंबरला पहिली उपांत्य लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. २०१६च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया हेच दोन संघ आमनेसामने आले होते.

उपांत्य फेरी

दिनांक               सामना                                   वेळ          

२२ नोव्हेंबर     वेस्ट इंडिज वि. ऑस्ट्रेलिया        मध्यरात्री १.३० वा.

२३ नोव्हेंबर     भारत वि. इंग्लंड                         पहाटे ५.३० वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:58 am

Web Title: england to face in form india in semis in womens t20 world cup
Next Stories
1 जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : वादग्रस्त लढतीत सोनिया विजयी
2 राष्ट्रीय उपकनिष्ठ बास्केटबॉल स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुलींना विजेतेपद
3 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिलांमध्ये राजमाता जिजाऊ, पुरुषांमध्ये अंकुर संघ अजिंक्य
Just Now!
X