27 February 2021

News Flash

IND vs ENG : १० वर्षांतील कामगिरीत कोण आहे सरस?

पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेला सुरुवात होणार आहे...

England tour of india 2021: पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लडच्या संघाचं भारतामध्ये आगमन झालं आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. यातील दोन कसोटी सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अखेरची कसोटी मालिका २०१८ मध्ये झाली होती. ही मालिका इंग्लंड संघानं ४-१ च्या फरकानं जिंकली होती. २०२१ मध्ये होणारी कसोटी मालिका जिंकून भारतीय संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.

ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन २-१ असे नमवल्यानंतर आता संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे भारतामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे दडपण इंग्लंडवरच अधिक आले आहे. याचप्रमाणे ही मालिका भारतीय भूमीवर असल्याने घरगुती खेळपट्ट्यांची अनुकूलताही भारताला मिळू शकेल. त्यामुळे भारतासाठी हा पेपर सोपा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण इंग्लंड संघाला कमी लेखण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण गेल्या १० वर्षांतील भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेटची आकडेवारी इंग्लंडसाठी अनुकूलता दर्शवते. २०१२ मध्ये अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने भारतामधील कसोटी मालिका फिरकी गोलंदाजीच्या बळावर २-१ अशी जिंकण्याची किमया साधली होती. गतवर्षी एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील विश्वविजेतेपद काबीज करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आता ऑस्ट्रेलियापेक्षाही भक्कम स्थान निर्माण केले आहे.

आणखी वाचा- IND vs ENG : कधी-कुठे कसे पाहता येणार सामने, जाणून घ्या सर्वकाही

दोन्ही संघाची कामगिरी कशी आहे?

भारत आणि इंग्लंड यांच्यामधील १२२ कसोटी सामन्यांत ४७ सामने इंग्लंडने आणि २६ सामने भारताने जिंकले आहेत. म्हणजेच भारताच्या विजयाची टक्केवारी २१.३१ इतकी आहे. गेल्या १० वर्षांतील २३ कसोटी सामन्यांपैकी १३ सामने इंग्लंडने जिंकले आहेत, तर ७ सामने भारताने जिंकले आहेत. २०१६-१७मध्ये इंग्लंडने भारत दौऱ्यावर ०-४ असा मानहानीकारक पराभव पत्करला होता, तर २०१८मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने १-४ अशी गमावली होती. भारतात उभय संघांमध्ये झालेल्या ६० कसोटी सामन्यांपैकी १९ भारताने आणि १३ इंग्लंडने जिंकल्या आहेत.

चेन्नईत वरचढ कोण?

चेन्नईमध्ये भारतीय संघानं ३२ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये १४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ११ सामने अनिर्णित राखले आहेत. या मैदानावर भारतीय संघाला ६ सामन्यात पराभव पाहावा लागला आहे. चेन्नईच्या मैदानावर भारतीय संघानं इंग्लंडविरोधात सात गड्यांच्या मोबदल्यात ७५९ धावांचा डोंगर उभा केला होता. ही भारताची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 4:14 pm

Web Title: england tour of india 2021 ind vs eng nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा मृत्यू? जाणून घ्या सत्य
2 अनिल कुंबळे नव्हे जसप्रीत बुमराह; लेग स्पिन पाहून जंबोही झाला हैराण!
3 ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतरही वॉर्नरची मुलगी आहे खूश, कारण….
Just Now!
X