05 March 2021

News Flash

IND vs ENG : हार्दिक, इशांतचं पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची निवड

India vs England Test Series : ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड करणाऱ्या टीम इंडियासाठी पुढचं आव्हान तयार आहे. पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. पितृत्वाच्या रजेनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचं दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. espncricinfo याबाबतचं वृत्त दिलं आहे. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे इशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. त्याने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन केले. त्यामुळे इशांत शर्माची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. इशांत शर्मानं फेब्रुवारी २०२० मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये दुखापत झाल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आलं होतं. त्याशिवाय कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करण्यास सज्ज आहे. २०१८ नंतर हार्दिक पांड्याचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी केली होती. यांचं संघातील स्थान कायम आहे. सिराजनं तीन कसोटी सामन्यात १३ विकेट घेतल्या होत्या. तर शार्दुल ठाकूरनं एकमेव कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करत ७ बळी घेतले आहेत.

असा आहे भारतीय संघ –

सलामीवीर : रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल

मधल्या फळीतील फलंदाज : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे आणि के. एल. राहुल

यष्टीरक्षक – ऋषभ पंत , वृद्धीमान साहा

अष्टपैलू – हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल

फिरकीपटू – आर. अश्विन, कुलदीप यादव

वेगवान गोलंदाज – जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

नेट बॉलर – अंकित राजपूत, आवेश खान, संदिप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार

Standbyes:: के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीप, राहुल चहर आणि अभिमान्य इश्वरन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 6:42 pm

Web Title: england tour of india 2021 india vs england test series kohli hardik ishant return to indias 18 member squad for england tests nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
2 “भारतीय संघाने मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली…”; अजित पवारांचं खास ट्विट
3 विराटनं रचला पाया, अजिंक्यनं चढवला कळस – रवी शास्त्री
Just Now!
X