News Flash

इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, पुण्यात रंगणार वन-डे सामने

अहमदाबादला दोन कसोटी सामन्यांसह टी-२० मालिकेचा मान

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासाठी पुढचं आव्हान तयार आहे. ४ कसोटी सामन्यांची मालिका संपवून भारतात परत आल्यानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे अशी प्रदीर्घ मालिका खेळायची आहे. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज या दौऱ्याची घोषणा केली. इंग्लंडचा संघ २०२० मध्ये भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा दौरा पुढे ढकलण्यात आला. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआय प्रत्येक खेळाडूच्या तब्येतीची काळजी घेईल असं आश्वासन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिलं आहे.

आरोग्यविषयक सर्व नियमांची पूर्तता करुन दोन्ही संघांना सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करण्यात येईल अशी माहिती शहा यांनी दिली. यासाठी Bio Secure Bubble तयार करण्यात येणार आहे. दरम्यान इंग्लंडचा संघ या मालिकेत ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत. यातील दोन सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे.

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक –

 • ५ ते ९ फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना – चेन्नई
 • १३ ते १७ फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना – चेन्नई
 • २४ ते २८ फेब्रुवारी – तिसरा कसोटी सामना – अहमदाबाद (दिवस-रात्र)
 • ४ ते ८ मार्च – चौथा कसोटी सामना – अहमदाबाद
  —————————————————————————–
 • १२ मार्च – पहिला टी-२० सामना
 • १४ मार्च – दुसरा टी-२० सामना
 • १६ मार्च – तिसरा टी-२० सामना
 • १८ मार्च – चौथा टी-२० सामना
 • २० मार्च – पाचवा टी-२० सामना

           (सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येतील)

——————————————————————————-

 • २३ मार्च – पहिला वन डे सामना
 • २६ मार्च – दुसरा वन डे सामना
 • २८ मार्च – तिसरा वन डे सामना

           (सर्व वन-डे सामने पुण्याच्या मैदानावर खेळवण्यात येतील)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 4:18 pm

Web Title: england tour of india 2021 schedule announced by bcci and ecb psd 91
Next Stories
1 भारत विरुद्ध इंग्लंड दिवस-रात्र कसोटी सामन्याचा मान अहमदाबादच्या मोटेरा मैदानाला
2 क्रिकेटव्यतिरीक्त विराटला आयुष्य आहे, स्टिव्ह स्मिथचा कोहलीला पाठींबा
3 संघात निवड करायची की नाही यावरुन होते मतभेद, मालिकावीराचा किताब पटकावत हार्दिकचं निवड समितीला उत्तर
Just Now!
X