News Flash

कसोटी मालिकेत इंग्लंडचे निर्भेळ यश

पहिल्या डावात १८६ धावांची खेळी साकारणारा रूट सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

(संग्रहित छायाचित्र)

इंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका

भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध करताना इंग्लंडने श्रीलंकेला दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सहा गडी राखून धूळ चारली आणि मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.

चौथ्या दिवशी जॅक लीच आणि डॉमिनिक बेस या फिरकीपटूंनी प्रत्येकी चार बळी मिळवून श्रीलंकेचा दुसरा डाव १२६ धावांतच गुंडाळल्यामुळे इंग्लंडला विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य मिळाले. कर्णधार जो रूट या डावात अपयशी ठरला असला तरी, सलामीवीर डॉम सिब्ले (नाबाद ५६) आणि यष्टीरक्षक जोस बटलर (नाबाद ४६) यांनी चौथ्या गडय़ासाठी ७५ धावांची अभेद्य भागीदारी रचून इंग्लंडचा विजय साकारला. पहिल्या डावात १८६ धावांची खेळी साकारणारा रूट सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:00 am

Web Title: england unbeaten win in the test series abn 97
Next Stories
1 शरीरसौष्ठवाच्या स्पर्धाना लवकरच प्रारंभ
2 ला लिगा फुटबॉल : बार्सिलोनाच्या विजयात डे जाँगची चमक
3 IND vs ENG: …तर अर्धी मिशी उडवून मैदानात खेळायला उतरेन- रविचंद्रन अश्विन
Just Now!
X