News Flash

इंग्लंडला धक्का, दुखापतीमुळे अॅलेक्स हेल्स वन-डे मालिकेतून बाहेर

भारत मालिकेत १-० ने आघाडीवर

अॅलेक्स हेल्स (संग्रहीत छायाचित्र)

पहिल्या वन-डे सामन्यात भारताकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर यजमान इंग्लंडच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सलामीवीर अॅलेक्स हेल्स दुखापतीमुळे वन-डे मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्याआधी सरावादरम्यान हेल्स दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर पहिल्या सामन्यात त्याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता हेल्स मालिकेमधून बाहेर पडला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत अॅलेक्स हेल्सने आपल्या फलंदाजीची छाप पाडली होती. यानंतर ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या टी-२० सामन्यात हेल्सने नाबाद ५८ धावांची खेळी केली होती. या सामन्यात इंग्लंडचा संघ विजयी ठरला होता. पहिला वन-डे सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने हेल्सच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. भारत व इंग्लंड यांच्यातील दुसरा वन-डे सामना १४ जुलैरोजी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – रोहितच्या शतकापुढे इंग्लंड निष्रभ, भारत ८ गडी राखून विजयी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 3:26 pm

Web Title: england vs india 2018 injured alex hales out of odi series
टॅग : Ind Vs Eng
Next Stories
1 विनायक सामंत मुंबई रणजी संघाचे नवीन प्रशिक्षक
2 रोनाल्डोविरोधात कामगार संपावर जाणार
3 सुवर्णकन्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव, ट्विटरवरुन दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा
Just Now!
X