इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेतून माघार घेतल्यानंतर जसप्रीत बुमराह पहिल्या ३ कसोटी सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. आयर्लंडविरुद्ध टी-२० सामन्यादरम्यान बुमराहच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. बुमराहच्या अनुपस्थितीत कुलदीप यादवने भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. इंग्लंडविरुद्ध पहिल्या ३ कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआय आज भारताचा संघ जाहीर करणार आहे. Cricinfo या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार बुमराहला पहिल्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघात जागा मिळणार नाहीये. याचसोबत ऋषभ पंतलाही कसोटी संघात जागा मिळु शकते. याचसोबत वृद्धिमान साहाच्या सहभागाबद्दलही शंका उत्पन्न केली जात आहे.

बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला भारतीय संघात जागा मिळू शकते. यो-यो टेस्ट नापास झाल्यामुळे शमीची वन-ड़े मालिकेसाठी संघात निवड झाली नव्हती, मात्र कसोटी मालिकेसाठी शमीने पुन्हा यो-यो टेस्ट देत आपण कसोटी मालिकेसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.

अवश्य वाचा – सलग दुसऱ्या सामन्यात जो रुटचं शतक, ८ गडी राखून इंग्लंड विजयी; भारताने मालिकाही गमावली

याव्यतिरीक्त जलदगती गोलंदाजीत इशांत शर्मा, भुवनेश्वर आणि उमेश यादव यांना संघात जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर फिरकी गोलंदाजीचा भार हा पुन्हा एकदा रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या खांद्यावर जाणार आहे. टी-२० आणि वन-डे मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कुलदीपचाही भारतीय संघासाठी विचार केला जाऊ शकतो.

अवश्य वाचा –  तिसऱ्या वन-डे सामन्यात नोंदवले गेलेले ‘हे’ १० विक्रम माहिती आहेत का?