इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून मँचेस्टरच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. मालिका १-१ अशी बरोबरीत आल्यानंतर अखेरच्या कसोटीत कोणता संघ बाजी मारुन विजेतेपद पटकावतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. तब्बल ४ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पुनरागमन केल्यामुळे या मालिकेचा निकाल हा ऐतिहासीक ठरणार आहे. दरम्यान विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने अखेरच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू हे लाल टोपी घालून मैदानात उतरणार आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रू स्ट्रॉसच्या पत्नीच्या स्मरणार्थ दोन्ही संघांनी हा निर्णय घेतला आहे. स्ट्रॉसची पत्नी रुथला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. ज्यात तिने अखेरचा श्वास घेतला. पत्नीच्या निधनानंतर अँड्रू स्ट्रॉसने तिच्या नावाने कॅन्सरग्रस्तांसाठी निधी उभारण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या निधीसाठी दोन्ही संघातील खेळाडू या सामन्यात लाल टोपी घालून मैदानात उतरले.

दोन्ही संघातील खेळाडू रुथ स्ट्रॉसच्या स्मरणार्थ लाल टोपी, आणि लाल रंगाची छटा असलेली जर्सी घालणार आहेत. २९ डिसेंबर २०१८ रोजी वयाच्या ४६ व्या वर्षी अँड्रूची पत्नी रुथने उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. मूळची ऑस्ट्रेलियाची असलेल्या रुथला अँड्रू स्ट्रॉस १९९८ साली सिडनीत एका बारमध्ये क्लब क्रिकेटच्या सामन्यादरम्यान भेटला होता