07 April 2020

News Flash

इंग्लंडचा २-१ असा मालिका विजय

इंग्लंड-आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिका

(संग्रहित छायाचित्र)

कर्णधार ईऑन मॉर्गन (५७ धावा), जोस बटलर (५७) आणि जॉनी बेअरस्टो (६४) या तिघांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी आणि पाच चेंडू राखून मात केली. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना हेन्रीच क्लासेन (६६) आणि तेम्बा बव्हुमा (४९) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ६ बाद २२२ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९.१ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. मॉर्गनने तब्बल सात षटकारांसह २२ चेंडूंतच ५७ धावा फटकावल्या. मॉर्गनच सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 1:14 am

Web Title: england win the series 2 1 abn 97
Next Stories
1 भारताला ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाची उत्तम संधी!
2 आशियाई कुस्ती स्पर्धा : पाकिस्तानच्या कुस्तीपटूंना भारतात प्रवेश
3 मॅँचेस्टर सिटीवरील बंदी धक्कादायक!
Just Now!
X