कर्णधार चालरेटी एडवर्ड्स व सराह टेलर यांच्या शैलीदार फलंदाजीमुळेच इंग्लंडने महिलांच्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेचा डाव १९.५ षटकांत केवळ १०१ धावांमध्ये कोसळला. त्याचे श्रेय इंग्लंडच्या अ‍ॅना श्रुबसोले (२/१२) हिच्या प्रभावी गोलंदाजीला द्यावे लागेल.  आफ्रिकेच्या शोली टिरॉन (४०) व मिग्नॉन डीप्रीज (२३) या दोनच खेळाडू दोन आकडी धावा करू शकल्या. विजयासाठी आवश्यक असणारे १०२ धावांचे ध्येय इंग्लंडने १६.५ षटकांत पार केले. त्यामध्ये टेलर (नाबाद ४४), एडवर्ड्स (३६) व हीदर नाइट (नाबाद २१) यांचा महत्त्वाचा वाटा होता. विजेतेपदासाठी इंग्लंडची ऑस्ट्रेलियाशी रविवारी गाठ पडणार आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : १९.५ षटकांत सर्वबाद १०१ (शोली टिरॉन ४०, मिग्नॉन डीप्रीज २३; अ‍ॅना श्रुबसोले २/१२) पराभूत वि. इंग्लंड : १६.५ षटकांत १ बाद १०२ (सराह टेलर नाबाद ४४, एडवर्ड्स ३६, हीदर नाईट नाबाद २१)