भारताच्या फिरकी माऱ्याला इंग्लंडच्या फलंदाजांनी समर्थपणे तोंड दिले असले तरी पाच डिसेंबरपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडच्या फलंदाजांनी नेटमध्ये कसून सराव केला. इंग्लंडचा फिरकीपटू मॉन्टी पनेसारसह कोलकाताच्या दोन स्थानिक फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर पाहुण्या संघातील फलंदाजांनी सराव केला.
इंग्लिश क्रिकेटपटूंनी दोन तुकडय़ांमध्ये सराव केला. केव्हिन पीटरसन दुपारनंतर सरावासाठी उतरला होता. त्यासह कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याने गोलंदाजी प्रशिक्षक मुश्ताक अहमद यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. अन्य क्रिकेटपटूंनी दोन नेटमध्ये कसून सराव केला.
सरावानंतर इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो म्हणाला, ‘‘मुंबई कसोटीत फिरकीपटूंचे आव्हान आम्ही पेलवले असले तरी उर्वरित दोन कसोटी सामन्यांत आम्हाला पुन्हा भारताच्या भक्कम फिरकी गोलंदाजीला तोंड द्यायचे आहे.
कोलकात्यात आम्हाला हवामान आणि रिव्हर्स स्विंग गोलंदाजीचा सामना करावा लागेल.’’