कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात जुना प्रकार. गेली अनेक वर्षे कसोटी क्रिकेट खेळले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रमही केले गेले आहेत. असाच एक विक्रम एका अनुभवी खेळाडू केला आहे. या कसोटीपटूने सलग १२ वर्षे कसोटी क्रिकेट खेळले असून त्यातील एकही सामना चुकवलेला नाही आणि महत्वाचे म्हणजे या विक्रम करताना या क्रिकेटपटूने अॅलन बॉर्डर या दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडीत काढला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक याने हा विक्रम केला आहे. गेल्या १२ वर्षात कूकने इंग्लंडकडून एकही सामना चुकवलेला नाही. पण यातील विक्रम म्हणजे सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याने केला आहे. ३३ वर्षीय कूकने ११ मे २००६ ला श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्स येथे सामना खेळला. त्यानंतर त्याने मागे वळून पहिले नाही. तो सलग सामने खेळात राहिला. आणि अखेर शुक्रवारी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने सलग १५४ वी कसोटी खेळली. या कसोटीबरोबर त्याने अॅलन बॉर्डरचा सलग १५३ सामने खेळण्याचा विक्रम मोडला.
इतकेच नव्हे तर १५४ सामने खेळण्यासाठी कूकला कमी कालावधी लागला. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ सलग १०७ कसोटी सामने खेळून तिसरा तर भारताचा लिटिल मास्टर सुनील गावस्कर हा १०६ कसोटींसह चौथा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 3:53 pm