01 October 2020

News Flash

इंग्लंडचा भारत दौरा पुढे ढकलला

२०२१ मध्ये नव्याने जाहीर होणार तारखा

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित इंग्लंड संघाचा भारत दौरा दोन्ही क्रिकेट बोर्डांनी पुढे ढकलला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अधिकारी २०२१ साली जानेवारी महिन्याच्या अखेरीस इंग्लंडचा दौरा आखण्याच्या तयारीत आहेत. याव्यतिरीक्त २०२१ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणंही अपेक्षित आहे.

“ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यानंतर आम्ही आता इतर क्रिकेट बोर्डांशी नियोजीत दौऱ्यांबद्दल चर्चा करुन निर्णय घेऊ शकतो. सध्याच्या घडीला करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता दौरा करणं अशक्य आहे. यासाठी भारताचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. बीसीसीआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरच याबद्दल माहिती देण्यात येईल.” इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टॉम हॅरिसन यांनी माहिती दिली. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही २०२१ मध्ये इंग्लंडचा भारत दौरा नव्याने आखण्याबद्दल चर्चा सुरु असल्याचं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 10:25 am

Web Title: englands white ball series in india postponed until early 2021 psd 91
Next Stories
1 अमिरातीत ‘आयपीएल’ला सरकारची तत्त्वत: मान्यता
2 युरोपा लीग फुटबॉल : सेव्हिया, वोल्व्हस उपांत्यपूर्व फेरीत
3 सिंधू, प्रणीत, सिक्की यांचा चार महिन्यांनी सरावाला प्रारंभ
Just Now!
X