सामान्यपणे क्रिकेपटू आपल्या दमदार प्रदर्शनामुळे क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये घर करतात. याच प्रसिद्धीच्या जोरावर ते नाव आणि पैसा कमवतात. मात्र काही क्रिकेटपटू हे मैदानापेक्षा मैदानाबाहेरील वर्तवणुकीसाठी बदनाम असतात आणि अशा क्रिकेटपटूंचे कारनामे कायमच पेज थ्री न्यूजमध्ये दिसतात. असच काहीसं घडलं आहे. इंग्लंडमधील २९ वर्षीय क्रिकेटपटू डेव्हिड हाइमर्ससोबत. पोलिसांनी नुकतीच डेव्हिडला अटक केली आणि ती सुद्धा क्रिकेट सामाना सुरु असणाऱ्या मैदानामधून. क्लब क्रिकेटर म्हणून स्थानिक पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या डेव्हिडवर फार गंभीर आरोप लावण्यात आलेत. डेव्हिडनने अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. डेव्हिड हा शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवायचा अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केलीय.

डेव्हिडला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्यानंतर इंग्लंड क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच ईसीबीनेही त्याच्यावर मोठी कारवाई करत त्याला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. द मिररमधील वृत्तानुसार डेव्हिडला पर्दाफाश करण्यासाठी गार्डियन्स ऑफ द नॉर्थ नावाच्या एका ग्रुपने सोशल मीडियावर एका अल्पवयीन मुलीच्या नावाने बनावट अकाऊंट ओपन केलं. तर या अकाऊंटवर डेव्हिड सतत अश्लील मेसेज पाठवायचा. हे एका अल्पवयीन मुलीचं अकाऊंट आहे याची संपूर्ण कल्पना असतानाही डेव्हिड यावर अश्लील मेसेज पाठवायचा.

नक्की पाहा >> ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं

डेव्हिड अशाप्रकारे अश्लील मेसेज प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत. मागील वेळेस त्याला पोलिसांनी इशारा देऊन सोडून दिलं होतं. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे. डेव्हिडच्या संघातील खेळाडूंना आणि त्याला ओळखणाऱ्यांना डेव्हिड अशापद्धतीचं कृत्य करु शकतो यावर विश्वासच बसत नाहीय. मात्र डेव्हिडने पोलिसांकडे जबाब नोंदवला असून त्यात त्याने आपण मुलींसोबत सेक्स चॅट करतायचे असं मान्य केलं आहे. अगदी १३-१४ वर्षाच्या मुलींसोबतही तो सेक्स चॅट करायचा. मुलींसोबत अशापद्धतीच्या गप्पा मारता याव्यात म्हणून त्याने सोशल नेटवर्किंगवर आपलं नावही बदललं होतं.

नक्की पाहा >> आपल्याला काय दिसतं अन् कष्ट किती असतं… ९७ वर्षानंतर देशाला ‘गोल्ड’ मिळवून देणारे ‘Golden Hands’ पाहिलेत का?

इंग्लंडमध्ये यापूर्वीही अशी प्रकरणं समोर आली आहेत. २०१९ मध्ये अ‍ॅलेक्स हेपबर्न नावाच्या खेळाडूलाही अशाच एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेलं. अ‍ॅलेक्स हा मूळचा ऑस्ट्रेलियन आहे. मात्र तो इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायचा. त्याने विद्यापिठामध्ये शिकणाऱ्या एका २३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आलेला. या प्रकरणात त्याचा पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली.