News Flash

‘‘लवकरच तू सलमान खान होशील”, वर्कआउटचा व्हिडिओ पाहून इंग्लिश क्रिकेटरनं केलं चहलला ट्रोल

'या' क्रिकेटपटूला चहलनेही भन्नाट रिप्लाय दिला आहे.

यजुर्वेंद्र चहल आणि सलमान खान

टीम इंडियाचा लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहल सोशल मीडियावर बर्‍याचदा चर्चेत असतो. त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. चहलने बुधवारी सोशल मीडियावर स्वत: चा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो वर्कआउट करताना दिसत आहे. चहलच्या व्हिडिओवर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू साजिद महमूदने एक भन्नाट प्रतिक्रिया दिली. त्यानंतर चहलनेही त्याला आश्चर्यकारक उत्तर दिले.

चहलने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शोल्डर, एब्स वर्कआउट करताना दिसत आहे. यावर साजिद मेहमूद म्हणाला, ”लवकरच तू सलमान खान होशील.” यानंतर चहलने त्याला उत्तर देत म्हटले, ”आर्नोल्ड श्वार्झनेगरबद्दल काय मत आहे?” ”आर्नोल्ड एक महान शरीरसौष्ठवपटू आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

हेही वाचा – धक्का बसेल, पण कसोटीत सर्वाधिक षटकारांच्या विक्रमात ‘या’ दिग्गजांपूर्वी साऊदीचं नाव येतं!

यजुर्वेंद्र चहल आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत घेत आहे. करोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, त्याच्या आई-वडिलांना या रोगाची लागण झाली होती. पण त्याचे कुटुंब करोनातून सावरले आहे. अलीकडेच तो त्याची पत्नी धनश्री वर्मासोबत वर्कआउट करताना दिसला.

सध्या चहल मुंबईत टीम इंडियाबरोबर क्वारंटाइन कालावधीत आहे. टीम इंडिया पुढील महिन्यात श्रीलंका दौर्‍यावर जाणार असून तिथे त्यांना तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या दौर्‍यावर शिखर धवन भारताचे नेतृत्व करेल, तर राहुल द्रविड भारताचा प्रशिक्षक असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 5:50 pm

Web Title: english former cricketer sajid mahmood trolled yuzvendra chahal on his workout adn 96
Next Stories
1 WTC Final: “विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ओव्हर रेटेड क्रिकेटपटू”
2 ICC Test Rankings: ‘हा’ भारतीय ठरला नंबर वन तर फलंदाजांमध्ये कोहलीसहीत ३ भारतीय Top 10 मध्ये
3 धक्का बसेल, पण कसोटीत सर्वाधिक षटकारांच्या विक्रमात ‘या’ दिग्गजांपूर्वी साऊदीचं नाव येतं!
Just Now!
X