अँथनी मार्शल आणि हॅरी मागायरे यांच्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये बलाढय़ चेल्सीवर २-० असा विजय मिळवला. या विजयामुळे मँचेस्टर युनायटेडने गुणतालिकेत ३८ गुणांसह सातव्या स्थानी झेप घेत पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. चेल्सी ४१ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

चेल्सीने या सामन्यात दोन गोल लगावले होते. पण ‘वार’ या पुनर्आढावा प्रणालीमुळे ते नाकारण्यात आले. त्याचबरोबर मिची बात्सुआयी याच्याबरोबर बाचाबाची झाल्यामुळे युनायटेडच्या मागायरे याला मैदानाबाहेर धाडण्यात आले.

एनगोलो कांटे याला दुखापत झाल्यामुळे चेल्सीला मोठा धक्का बसला. पहिल्या सत्रातील अखेरच्या मिनिटाला मार्शल याने गोल करत मँचेस्टर युनायटेडला आघाडीवर आणले. ६६व्या मिनिटाला मागायरे याने ही आघाडी २-० अशी केली. याच आघाडीच्या जोरावर मँचेस्टरने विजय मिळवला.