News Flash

लिस्टर सिटी तिसऱ्या स्थानी

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

(संग्रहित छायाचित्र)

केलेची इहिनाचो याने केलेल्या महत्त्वपूर्ण गोलमुळे लिस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये सोमवारी क्रिस्टल पॅलेसचा २-१ असा पराभव केला. या विजयासह ३३ सामन्यांत ६२ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.

नायजेरियाचा आघाडीवीर असलेल्या केलेचीने गेल्या १४ सामन्यांत १४ गोल झळकावत लिस्टर सिटीला पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स लीगचे स्थान मिळवून देण्याच्या समीप आणून ठेवले आहे. जॉनी इव्हान्सने दिलेल्या पासवर केलेची याने ८०व्या मिनिटाला निर्णायक गोल करत लिस्टर सिटीला विजय मिळवून दिला. केलेची याच्या गोलसाहाय्यामुळे टिमोथी कॅस्टाग्ने याने ५०व्या मिनिटाला लिस्टर सिटीसाठी गोल केला होते. त्याआधी विल्फ्रेड झाहा याने १२व्या मिनिटाला क्रिस्टल पॅलेसला आघाडी मिळवून दिली होती.

रेयाल सोसिएदादची आयबरवर मात

ला-लीगा फुटबॉल

माद्रिद : अलेक्झांडर इसाकने पहिल्या सत्रात केलेल्या एकमेव गोलमुळे रेयाल सोसिएदादने आयबर संघावर १-० अशी मात करत ला-लीगा फुटबॉलमध्ये पाचवे स्थान प्राप्त केले. यामुळे रेयाल सोसिएदादने युरोपा लीगची पात्रता मिळवण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. आता पाच फेऱ्या शिल्लक असून

लॅझियोचा एसी मिलानवर विजय

सेरी-ए फुटबॉल स्पर्धा

मिलान : जोआकिन कोरिया याने केलेल्या दोन गोलमुळे लॅझियोने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत एसी मिलानवर ३-० असा विजय मिळवला. लॅझियो संघ सहाव्या स्थानी असला तरी त्यांना चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. कोरियाने ७७व्या सेकंदाला आणि ५१व्या मिनिटाला गोल करत लॅझियोच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:27 am

Web Title: english premier league football leicester city jumped to third place abn 97
Next Stories
1 टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजकांच्या अडचणीत भर
2 DC vs RCB : बंगळुरूने ‘दिल्ली’ जिंकली!
3 GREAT BRETT..! पॅट कमिन्सनंतर ब्रेट लीची भारताला ४२ लाखांची मदत
Just Now!
X