News Flash

मँचेस्टर सिटीकडून ब्रायटनचा धुव्वा

मँचेस्टर युनायटेड आणि चेल्सी या दोन्ही संघांना अनुक्रमे साऊदम्प्टन आणि शेफिल्ड युनायटेडकडून बरोबरीवर समाधान मानावे लागले.

(संग्रहित छायाचित्र)

इंग्लिश प्रीमियर  फुटबॉल लीग

लंडन : सर्जियो अ‍ॅग्युरोच्या दोन गोलमुळे मँचेस्टर सिटीने शनिवारी ब्रायटनचा ४-० असा धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगच्या गुणतालिकेत १० गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मँचेस्टर युनायटेड आणि चेल्सी या दोन्ही संघांना अनुक्रमे साऊदम्प्टन आणि शेफिल्ड युनायटेडकडून बरोबरीवर समाधान मानावे लागले.

केव्हिन डे ब्रूयने याने दुसऱ्याच मिनिटाला सिटीचे खाते उघडले. अ‍ॅग्युरोने मध्यंतराआधी आणि दुसऱ्या सत्राच्या १०व्या मिनिटाला गोल करत सिटीची आघाडी वाढवली. त्यानंतर बर्नाडरे सिल्व्हाने ७९व्या मिनिटाला गोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 2:31 am

Web Title: english premier league manchester city vs brighton akp 94
Next Stories
1 ट्वेन्टी-२० मालिकेसाठी धोनीच्या निवडीची अपेक्षा नव्हतीच -गांगुली
2 Pro Kabaddi 7 : मोक्याच्या क्षणी गुजरातची बाजी, बंगळुरु बुल्सवर मात
3 भारत अ संघाची आफ्रिकेवर मात, मालिकेत २-० ने आघाडी
Just Now!
X