News Flash

Cricket World Cup 2019 : कॅप्टन मॉर्गनचा पहिल्याच सामन्यात विक्रम

पॉल कॉलिंगवूडला टाकलं मागे

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयी सुरुवात केली. १०४ धावांनी इंग्लंडने सामना जिंकला. ३१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २०७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. यादरम्यान मॉर्गन इंग्लंडकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधी घरच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात मॉर्गनने पॉल कॉलिंगवूडचा १९७ सामन्यांचा विक्रम मोडला. आफ्रिकेविरुद्धचा सामना मॉर्गनचा २०० वा सामना ठरला आहे. मॉर्गनच्या पाठीमागे पॉल कॉलिंगवूड (१९७ सामने), जेम्स अँडरसन (१९४ सामने), अॅलेक स्टुअर्ट (१७० सामने) आणि इयान बेल (१६१ सामने) हे खेळाडू आहेत.

मॉर्गनने फलंदाजीमध्येही आपली जबाबदारी बजावत ५७ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 2:09 pm

Web Title: eoin morgan breaks englands all time odi record in world cup 2019 opener
Next Stories
1 Cricket World Cup 2019: बेन स्टोक्सने घेतलेला ‘हा’ भन्नाट झेल पाहिलात का ?
2 cricket world cup 2019 : धक्कातंत्राला प्रारंभ?
3 Cricket World Cup 2019 : फ्री हिट : विक्रम आणि वेताळ
Just Now!
X