News Flash

Eng vs Ire : कर्णधार मॉर्गनचा धोनीला धोबीपछाड

तिसऱ्या वन-डे सामन्यात झळकावलं शतक, महत्वाचा विक्रम केला नावावर

आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने महत्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार हा विक्रम आतापर्यंत धोनीच्या नावावर होता. कर्णधार या नात्याने धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २११ षटकार मारले आहेत. आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात फटकेबाजी करताना मॉर्गनने धोनीला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे मॉर्गनने केवळ १६३ सामन्यांमध्ये हा विक्रम मोडला असून धोनीला हा विक्रम करण्यासाठी ३३२ सामने लागले होते. कर्णधार या नात्याने सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग तिसऱ्या (१७१ षटकार), ब्रँडन मॅक्यूलम चौथ्या (१७० षटकार) आणि एबी डिव्हीलियर्स (१३५ षटकार) पाचव्या स्थानावर आहेत.

मालिकेत विजयी आघाडी घेतलेल्या इंग्लंडची अखेरच्या वन-डे सामन्यात खराब सुरुवात झाली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय हे सलामीवीर झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार मॉर्गनने विन्स आणि टॉम बँटनसोबत भागीदारी रचत फटकेबाजी केली. आयर्लंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत मॉर्गनने ८४ चेंडूत १०६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. जोश लिटीलने मॉर्गनचा बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 8:37 pm

Web Title: eoin morgan breaks ms dhonis record for most sixes by international captain psd 91
Next Stories
1 BCCI च्या अडचणी वाढल्या, IPL ची स्पॉन्सरशिप रद्द करण्याचा VIVO चा निर्णय
2 ENG vs PAK : पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
3 IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ‘इतक्या’ वेळा होणार करोना टेस्ट
Just Now!
X