आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने महत्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार हा विक्रम आतापर्यंत धोनीच्या नावावर होता. कर्णधार या नात्याने धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २११ षटकार मारले आहेत. आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात फटकेबाजी करताना मॉर्गनने धोनीला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्वाची गोष्ट म्हणजे मॉर्गनने केवळ १६३ सामन्यांमध्ये हा विक्रम मोडला असून धोनीला हा विक्रम करण्यासाठी ३३२ सामने लागले होते. कर्णधार या नात्याने सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग तिसऱ्या (१७१ षटकार), ब्रँडन मॅक्यूलम चौथ्या (१७० षटकार) आणि एबी डिव्हीलियर्स (१३५ षटकार) पाचव्या स्थानावर आहेत.

मालिकेत विजयी आघाडी घेतलेल्या इंग्लंडची अखेरच्या वन-डे सामन्यात खराब सुरुवात झाली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय हे सलामीवीर झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार मॉर्गनने विन्स आणि टॉम बँटनसोबत भागीदारी रचत फटकेबाजी केली. आयर्लंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत मॉर्गनने ८४ चेंडूत १०६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. जोश लिटीलने मॉर्गनचा बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eoin morgan breaks ms dhonis record for most sixes by international captain psd
First published on: 04-08-2020 at 20:37 IST