News Flash

Video : “युवराजच्या ‘त्या’ प्रश्नाचं माझ्याकडे आजही उत्तर नाही”

टीव्ही अँकर एरिनला कॅनडात विचारला होता प्रश्न

टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून IPL 2019 नंतर निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर तो ग्लोबल टी-२० कॅनडा या स्पर्धेत खेळत होता. स्पर्धेदरम्यान युवराजने अष्टपैलू बेन कटींग आणि त्याची गर्लफ्रेंड एरिन हॉलंड यांची एक प्रश्न विचारून चांगलीच कोंडी केली होती. त्या घटनेचा व्हिडीओ कॅनडा टी-२० लीगच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आला होता. तोच व्हिडीओ पोस्ट करून एरिनने आपल्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही नसल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

House hunting is HARD!! Sunset walks to unwind after a biiit of a stressful day. Love having you in my hood @cuttsy_31

A post shared by ERIN HOLLAND (@erinvholland) on

काय होता युवीचा प्रश्न?

सामन्यापूर्वी एरिन हॉलंड बेन कटींगची मुलाखत घेत होती. ती त्याची मुलाखत घेत असताना युवराज मध्येच आला. मुलाखतीमध्ये जाऊन युवराजने त्यांना ‘लग्न कधी करणार?’ असा थेट प्रश्न केला. युवराजचा हा प्रश्न ऐकून बेन कटींग आणि त्याची गर्लफ्रेंड हॉलंड यांना हसू अनावर झाले. पण युवराजने मात्र लगेच तेथून पळ काढला. ग्लोबल टी२० कॅनडाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा मजेदार व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तोच व्हिडीओ एरिनने पुन्हा शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A year ago today & we still can’t answer @yuvisofficial ‘s question…#whensthewedding #gt20canada

A post shared by ERIN HOLLAND (@erinvholland) on

युवराजचा हा व्हिडीओ पोस्ट करत तिने व्हिडीओखाली कॅप्शन लिहिले की “(तुम्ही लग्न कधी करताय हा प्रश्न विचारून) आज एक वर्ष पूर्ण झालं. अजूनही युवराजच्या ‘त्या’ प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही.”

दरम्यान, युवराजने मजेशीर पद्धतीने हा प्रश्न विचारल्यानंतर काही सामन्यांमध्ये प्रेक्षकांनीही फलक हातात घेत हा प्रश्न विचारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 2:39 pm

Web Title: erin holland opens up on wedding plans with ben cutting says still can not answer yuvraj singh question vjb 91
Next Stories
1 मॅच फिक्सिंग प्रकरण : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या बंदीच्या शिक्षेत घट
2 Coronavirus : जागतिक क्रमवारीतील ‘नंबर १’ अ‍ॅशले बार्टीची US Openमधून माघार
3 धोनी की पॉन्टींग? आफ्रिदीने सांगितला आवडता कर्णधार
Just Now!
X